'लाल कप्तान' चा नवीन ट्रेलर : मस्ट वॉच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2019
Total Views |


प्रेक्षकांना खूप दिवसांपासून ज्याची उत्सुकता होती तो 'लाल कप्तान' चा अखेरचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. सैफ अली खानचा ट्रेलरमधील अभिनय अंगावर काटे आणतो. अतिशय गुंतागुंतीची अशी ही ट्रेलरची रचना असल्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आता अधिकच वाढेल हे निश्चित. हा ट्रेलर पाहिल्यावर नागा साधूंविषयीचे नेमके काय रहस्य आहे हे जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते. आणि हेच चित्रपटकर्त्यांचे यश आहे असे म्हणावे लागेल.

'द रिव्हेंज' असा हा ट्रेलरमधील तिसरा भाग आज पारदर्शिता झाला. नवदीप सिंह दिग्दर्शित 'लाल कप्तान' या चित्रपटाला आनंद एल. राय निर्मितीसहाय्य्य देत आहेत. या चित्रपटातील सैफ अली खान एका नागा साधूची भूमिका साकारणार आहे. आणि त्याच्या या ट्रेलरमधील अभिनयाने त्याच्या चित्रपटातील अभिनयाकडे प्रेक्षकांचे लक्ष रोखले जाईल इतका प्रभावीपणे त्याने ट्रेलरमधील प्लॉट साकारला आहे.

सैफ अली खान बरोबरच या चित्रपटात मानव वीज, झोया हुसेन,दीपक डोब्रियाल आणि सिमॉन सिंह हे देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. येत्या १८ ऑक्टोबरला चित्रपट देशभर प्रदर्शित होईलच पण तत्पूर्वी ज्यामुळे तुमची उत्सुकता आणखीनच वाढेल असा हा ट्रेलर नक्की बघा.

@@AUTHORINFO_V1@@