आर्थिक आघाडीवर मोदींचे यश : भारताचे 'रूपे' कार्ड आता सौदी अरेबियातही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2019
Total Views |




रूपे कार्डला मान्यता देणारा सौदी अरेबिया १९५ वा देश ठरला 
 
 


नवी दिल्ली :
भारताचे रूपे कार्डला आता सौदी अरेबियानेही मान्यता दिली आहे. रूपे कार्डला मान्यता देणारा सौदी अरेबिया हा आखाती देशातील तिसरा देश ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोडी सौदी अरेबिया देशाच्या दोन-दिवसीय दौऱ्यावर आहेत. मोदींच्या दौऱ्यात भारत-सौदी अरेबिया संबंध बळकट करण्याच्या दृष्टीने उभयदेशांमध्ये चर्चा होणार आहे.



आजवर भारतात अमेरिकेन मास्टरकार्ड आणि व्हिजा ह्या दोन डेबिट/क्रेडीट कार्डचीच चलती होती. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये रूपे ह्या स्वदेशी कार्डची सुरवात करण्यात आली. जगभरातून मिळत असलेल्या स्वीकार्हतेमुळे रूपे आता 'मास्टरकार्ड' व 'व्हिजा' दोघांसाठी ताकदीचा स्पर्धक ठरणार आहे. जगभरातील १९५ देशात आता रूपे कार्ड आर्थिक व्यवहारांसाठी चालणार आहे.

रूपे कार्डला आता हळूहळू जगमान्यता मिळू लागली आहे. रूपे कार्ड वापरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मोदी २.० सरकारचे हे आर्थिक आघाडीवरील यश समजले जाते आहे.
 
 
 


 
@@AUTHORINFO_V1@@