काश्मीरात युरोप संघाच्या प्रतिनिधींनी घेतली जवानांची भेट

    29-Oct-2019
Total Views |


 

श्रीनगर : जम्मू काश्मिरचा विशेषाधिकार रद्द केल्यानंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी युरोपियन संघातील २३ खासदारांचे एक शिष्टमंडळ मंगळवारी भारतात पोहोचले. जीओसी १५ जवानांची श्रीनगर येथे त्यांनी भेट घेतली. प्रतिनिधी मंडळातील खासदार बी.एन.डन यांच्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यातील सर्व सामान्य नागरिकांशी कलम ३७० बद्दल चर्चा केली जाणार आहे. हे मंडळ स्थानिकांशी चर्चा करण्यावर भर देणार आहे.

 

या दोन दिवसीय दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शिष्टमंडळाची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या वक्तव्यानुसार, या शिष्टमंडळाला जम्मू काश्मीर आणि लद्दाख क्षेत्रातील विविधता आणखी विस्तृतपणे समजण्यास मदत होईल. यासह रेल्वेतील सरकार संबंधी प्रार्थमिक परिस्थितीचीही माहिती घेता येईल.