'५०-५०'चा फॉर्म्युला ठरलाच नव्हता : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2019
Total Views |


 


मुंबई : २०१९च्या लोकसभा निवडणुकापूर्वी शिवसेना आणि भाजप यांच्यात विधानसभा निवडणुकीत अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेण्याचा फॉर्म्युला ठरल्याचा शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला. राज्यात आगामी सरकार हे युतीचेच असेल, असे ते म्हणाले. मंगळवारी दुपारी वर्षा येथील आपल्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यानिमित्ताने ते बोलत होते.

 

फडणवीस म्हणाले, "राज्यात आमचे सरकार पुन्हा स्थापन होईल. शिवसेना आणि भाजपच्या याबद्दल बैठका सुरू असून त्यावर लवकरच तोडगा निघेल. सत्तेत समसमान वाटप यावर भाजप अडून बसणार नाही. सहमतीने यातून मार्ग काढला जाईल. २०१४ मध्ये भाजपने २६० जागा लढून १२२ जागा आम्ही जिंकल्या. यावेळी १४५ लढून १०५ जिकल्या. याचा अर्थ जागा कमी असूनही आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे," असेही ते म्हणाले.

 

तिकीट वाटपात काही नेत्याची ताकत जोखण्यात पक्ष कमी पडल्याने बरेच बंडखोर निवडून आल्याचे फडणवीस म्हणाले. "आता बंडखोरांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्याकडे दहा अपक्ष आणि बंडखोर यांचे समर्थन असून बुधवारी भाजप विधिमंडळ नेतेपदाची निवड होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीला पक्षाध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार नसल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

दैनिक 'सामना'तून भाजपवर होणारी टीका चुकीची असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. सरकार दोघांचे आहे, मग टीका कशी होते, असेही त्यांनी विचारले. 'सामाना'चे संपादक संजय राऊत यांच्याविषयी आमच्या पक्षात नाराजी असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. प्रसिध्दी माध्यमाशी संवाद साधताना मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस, प्रवक्ते केशव उपाध्ये आणि माधव भंडारी उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@