मनोहरलाल खट्टर यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2019
Total Views |
 


चंदिगढ : हरियाणात रविवारी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वात भाजप-जननायक जनता पार्टी (जेजेपी) युती सरकारचा शपथविधी पार पडला. खट्टर यांनी दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच केवळ शपथ घेतली. कॅबिनेट नेत्यांच्या मंत्रीपदासाठी शपथविधी होईल, अशी शक्यता आज व्यक्त केली जात होती मात्र, केवळ मुख्यमंत्रीपदाठी खट्टर आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी दुष्यंत चौटाला यांचा शपथविधी झाला.

 
 
 
 

भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या शनिवारी सकाळी चंदिगढ येथील गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत विद्यमान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची दुसर्‍यांदा नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते रवीशंकर प्रसाद, अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच भाजप महासचिव अरुणसिंह उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@