सरकार महायुतीचेच ! ; चंद्रकांतदादांचा विश्वास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2019
Total Views |


कोल्हापूर शिवसेना-भाजप महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही सत्तास्थापनेसाठी विविध समीकरणे जुळवली जात असल्याच्या चर्चांना चंद्रकांतदादा पाटील यांनी पूर्णविराम दिला. सरकार शिवसेना-भाजप आणि इतर घटक पक्षांचेच मिळून बनेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपला बंडखोरांमुळे फटका बसला असून त्यात शिवसेनेचाही मोठा वाटा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या सत्तेच्या चाव्यांबद्दल आणि संजय राऊत यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, त्यांची पक्ष चालवण्याची ती पद्धती आहे, अशी प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली.


कोल्हापूरातील पराभवाचे खापर त्यांनी शिवसेनेवर फोडले. शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने येथे भाजपच्या विरोधात उघड-उघड बैठका घेतल्या जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. कोल्हापूरच्या जनतेलाही त्यांनी प्रश्न विचारले. विकासकामे करत असणाऱ्या पक्षाला नाकारून एलबीटी कर आकारणारे कसे निवडून येतात, विमानतळ बंद ठेवणारे कसे निवडून येतात, शहरे बकाल करणारे कसे निवडून येतात, असे प्रश्न विचारत आपली उघड नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

मुख्यमंत्री महायुतीचाच : सुधीर मुनगंटीवार

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही सूचक वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार, असे भाकीतही त्यांनी केले. भाजप-शिवसेना एकत्र लढले ते आता कॉंग्रेससोबत कसे जातील, असा प्रतिप्रश्नही त्यांनी यावर प्रतिक्रीया देताना केला. भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येऊनच याबद्दलचा निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@