मुख्यमंत्री भाजपचाच! : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2019
Total Views |
 


मुंबई : "भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला जनतेने जनादेश दिला आहे. त्यामुळे राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालीच नवीन सरकार बनेल आणि ते पुढील पाच वर्षे चालेल," अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.मुंबई भाजपच्या दिवाळी संमेलनात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील सरकारचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल, हे स्पष्ट केले. ऐन दिवाळीच्या सणातही राजकीय घडामोडींचे केंद्र मुख्यमंत्र्यांच्या भोवतीच फिरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई भाजपने आयोजित केलेल्या दिवाळी संमेलनात मुख्यमंत्री सामील झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली.


शिवसेनेचे संख्यबळ वाढले

राज्यात सत्तास्थापनेसाठी मोठी रस्सीखेच सुरु असतानाच शिवसेनेच्या संख्याबळात काहीशी भर पडल्याचे चित्र रविवारी पहायला मिळाले. आतापर्यंत चार अपक्ष आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा मिळाला असून त्यांच्या आमदारांचे संख्याबळ साठवर गेले आहे. याबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, "काही दिवसांत अनेक आमदार शिवसेनेला पाठिंबा जाहीर करतील. राज्यातील सत्तेच्या कॅनव्हासवर रंग भरण्यासाठी ब्रश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच हातात आहे," अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज्यातील सत्तास्थापनेच्या रिमोट कंट्रोल शिवसेनेच्या हातात असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

@@AUTHORINFO_V1@@