आव्हानांशी दोन हात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे : उपराष्ट्रपती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2019
Total Views |


 

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी दहशतवाद, हवामान बदल, साथीचे रोग, आर्थिक संकट, सायबर सुरक्षा यासारख्या समकालीन आव्हानांना कोणतीही सीमा नसते आणि त्यासाठी प्रत्येकानी देशासमोरील आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्यावर भर दिला पहिले असे मत व्यक्त केले. बाकु येथे आज पार पडलेल्या १८ व्या निरपेक्ष संमेलनाला संबोधित करताना ते बोलत होते.

अझरबैजान राजधानी बाकु येथे जगातील १२० देशांच्या १८ व्या निरपेक्ष परिषदेचा वृत्तांत देताना नायडू यांनी जागतिक शांतता, सुरक्षा, सहअस्तित्व आणि पर्यावरण संरक्षणाविषयी चर्चा झाली पण दहशतवाद हा चर्चेचा सर्वात महत्वाचा मुद्दा ठरल्याचे सांगितले. याप्रसंगी पाकिस्तानकडून काश्मीरच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरु करण्यात आली असता नायडू यांनी पाकिस्तानी प्रतिनिधींना चांगलेच प्रत्युत्तर दिले आणि त्यांचे मुद्दे खोदून काढले. जगातील नेत्यांना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की पाकिस्तान हा दहशतवादाचे मूळ आहे जिथून संपूर्ण जगात दहशतवादाचा प्रसार होतो आहे. तसेच काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

 

दहशतवादाविरूद्ध समन्वित आणि प्रभावी कारवाई केली पाहिजे आणि त्यासाठी देशांचा एक संयुक्त मोर्चा स्थापन करण्यात यावा अशी मागणी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी यावेळी केली. बदलत्या जागतिक आव्हानांनुसार आपले लक्ष सुद्धा बदलले पहिले. तत्पूर्वी, तीन दिवसांच्या अझरबैजान दौर्‍यावर गेलेले उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी परिषदेच्या आधी इराण, नेपाळ आणि बांगलादेशच्या नेत्यांची भेट घेतली.
@@AUTHORINFO_V1@@