व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा जल्लोष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2019
Total Views |





वॉशिंग्टन
: अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली.अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध धर्मीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की ."या महोत्सवातून अमेरिकेतील प्रत्येक वर्गाला धार्मिक स्वातंत्र्य मिळाल्याचे दिसून येते."

ते म्हणाले की ."प्रत्येक गटाला धार्मिक स्वातंत्र्य देणे हे देखील अमेरिकेचे एक तत्व आहे. तत्पूर्वी, ट्रम्प यांनी ओव्हल कार्यालयात जाऊन भारतीय-अमेरिकन गटाच्या लोकांसह दिवाळी साजरी केली. तथापि, यावेळी माध्यमांच्या लोकांना आत जाऊ दिले नाही."

या प्रसंगी ट्रम्प म्हणाले की त्यांचे प्रशासन घटनेनुसार सर्व धर्मातील लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करेल. ते म्हणाले की, "दिवाळीच्या दिवशी मी आणि माझी पत्नी मेलेनिया सर्वाना हार्दिक शुभेच्छा देतो. हा सण अमेरिकेत आणि जगभरातील हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध धर्मीयांसाठी एक आनंदाचा क्षण आहे. हा सण अंधारावर प्रकाश, अज्ञानावर ज्ञान आणि वाईटावर चांगले असा संदेश देतो."

@@AUTHORINFO_V1@@