तुमच्या 'DTH'ची KYC पूर्ण झाली का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2019
Total Views |



नवी दिल्ली : 'टेलिकॉम ऑथोरीटी ऑफ इंडिया'तर्फे 'डीटीएच' कनेक्शनसाठी KYC (Know Your Customer) प्रक्रीया बंधनकारक केली आहे. यापूर्वीही बऱ्याच नियमांमध्ये बदल करण्यात आले होते. मात्र, या नव्या नियमावलीमुळे आता तुम्हाला आणखी एक प्रक्रीया पूर्ण करावी लागणार आहे. नव्याने कनेक्शन घेणारे आणि जून्या ग्राहकांनाही आता ही प्रक्रीया पूर्ण करावी लागणार आहे.

 

सिमकार्ड घेण्यासंदर्भातील सर्व प्रक्रीया पूर्ण करावी लागणार

डीटीएच कनेक्शन घेण्यासाठीची KYC प्रक्रीया सिमकार्ड खरेदी करताना होणाऱ्या प्रक्रीयेसारखीच आहे. KYC पूर्ण झाल्यानंतरच सेट ऑफ बॉक्स मिळणार आहे. जुन्या ग्राहकांना ही प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी आता दोन वर्षांची मर्यादा देण्यात आली आहे.

 

KYC संदर्भात ठळक वैशिष्ट्ये

 

· सेट ऑफ बॉक्ससाठी KYC संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. 'ट्राय'ला आता सर्व भागधारकांकडून संमती मिळाल्यानंतर ही प्रक्रीया पुन्हा सुरू केली आहे.
 

  · टाटा स्काय, एअरटेल डीटीएच, हॅथवे आदीसारख्या कंपन्यांकडून सेट ऑफ बॉक्स घेण्यासाठीही आता ही प्रक्रीया पूर्ण करावी लागणार आहे.

  
· कंपन्यांकडून ओटीपी पाठवल्यानंतर पडताळणी पूर्ण झाल्यावरच नव्याने कनेक्शन जोडले जाणार आहे.

 

· नवीन कनेक्शन घेताना जर ग्राहकाकडे मोबाईल नसेल तर त्यांना सरकारमान्य ओळखपत्र सादर करावे लागेल.

 

· ट्रायतर्फे कंपन्यांना दस्तावेज ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

· ज्या ग्राहकांनी पूर्वीपासूनच डीटीएच कनेक्शन घेतले असेल, अशा ग्राहकांची KYC पूर्ण करण्याची जबाबदारी केबल ऑपरेटर किंवा डीटीएच कंपनीची असणार आहे. लवकरच त्याबद्दल माहिती ग्राहकांना देण्यात येणार आहे.






 

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@