एकवेळ विरोधीपक्षात बसू पण शिवसेना नको : शरद पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2019
Total Views |



बारामती : शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील का ? , अशा चर्चा राजकीय वर्तूळात रंगली असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र, हा दावा फेटाळून लावला आहे. एकवेळ विरोधी बाकांवर बसू पण शिवसेना नको, असे पवार म्हणाले आहेत.

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले असून महायुतीला यश आले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या जागेत पूर्वीपेक्षा वाढ झाली. विरोधकांचे संख्याबळ वाढले असून शिवसेनेच्या काही जागा घटल्याचे यावेळी दिसून आले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ६३ जागांवर विजय मिळाला होता. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या एकूण सहा जागा घटल्या असून त्यांना केवळ ५६ जागांवरच समाधान मानावे लागले आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@