कमलेश तिवारींच्या हत्येचा 'व्हीडिओ' बनवून करायचा होता व्हायरल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2019
Total Views |




आरोपींच्या तपासात धक्कादायक माहिती उघड 


 

लखनऊ : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी चौकशीत पोलीसांसमोर धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी अशफाक आणि मोइनुद्दीन या दोघांनाही तिवारी यांचे शिर कापून त्याचा व्हीडियो व्हायरल करायचा होता. घटनास्थळी हत्येनंतर झालेल्या गोंधळामुळे त्यांचा प्रयत्न फसला होता, अशी कबुली त्यांनीही दिली.

 

तपासात धक्कादायक माहिती उघड

कमलेश तिवारी यांच्या हत्याप्रकरणी दोघांचीही चौकशीही सुरू आहे. क्राईम ब्रांच, एटीएस, एसटीएफतर्फे यांनी केलेल्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ३८ मिनिटांनी दोघेही भगव्या वस्त्रांमध्ये खुर्शेदबाग येथून निघाले. रस्त्यात एका दर्ग्यामध्ये थांबले होते. तिथे विचारपूस करत त्यांनी कमलेश तिवारी यांच्या घराकडे आपला मोर्चा वळवला होता.

 

भगव्या कपड्यांमुळे कुणी संशय घेतला नाही

दरम्यान, एक भगवी वस्त्रे परिधान केलेल्या महिलेला दोघे भेटले. आरोपींनी घातलेल्या भगव्या कपड्यांकडे पाहून त्यांना निवडणूक प्रचारासाठी आमंत्रित केले होते. त्या महिलेने स्वतःची ओळख अल्पसंख्यांक मोर्चाची पदाधिकारी, अशी सांगितली. दोघेही तिवारी यांच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांचे सुरक्षारक्षक झोपल्याचे त्यांना दिसले. तळमजल्यावर कुणीही नव्हते. वरच्या मजल्यावर गेल्यानंतर तिथला एक कर्मचारी त्यांना दिसला. तिवारी यांनी कुणीतरी भेटायला येणार असल्याची पूर्वकल्पना दिल्याने त्यानेही जास्त विचारपूस न करताच त्यांना एका कार्यालयाच्या खोलीत बसवले.

 

मिठाईच्या डब्यात नव्हते पिस्तूल

आफशाक आणि मोईनउद्दीन पाहूणे म्हणून तिवारी यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यासाठी एक मिठाईचा डब्बाही सोबत आणला होता. या डब्ब्यात चाकू आणि पिस्तुल नसून मिठाईच होती, असे त्यांनी चौकशीदरम्यान सांगितले. आफशाककडे पिस्तुल होते, तर मोईनउद्दीनने त्याच्या खिशात चाकू ठेवला होता. मिठाईच्या डब्ब्यासोबत असलेली दुकानाची पावती त्यांनी स्वतःकडे काढून घेतली होती.

 

तिवारी भेटले पण हल्ला करताना...

कमलेश तिवारी यांची भेट झाली तेव्हा त्यांना सतत फोन येत होते. तिवारीही कामानिमित्त कुणालातरी फोन करत होते. त्यामुळे चर्चेत अडथळे येत होते. "आता कामाचा व्याप वाढला आहे, पक्षाचे मोठे संमेलनही करायचे आहे.", असे ते फोनवर बोलत होते. अफशाकने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा त्यालाच बंदुक चालवायची होती. मात्र, पहिल्यांदा चाकूने वार करण्यात आला. त्यानंतर गोळी चालवण्यात आली. मात्र, गोळी मोईनउद्दीनच्या हातालाही लागली होती. यानंतर तिवारी यांच्या हातावरही वार करण्यात आले.

 

पोलीसांसमोर जाऊन करायचे होते आत्मसमर्पण

दोघांचे हात रक्ताने माखले होते. हात खिशात घालत दोघांनीही चौकात धाव घेतली. एका मेडिकलच्या दुकानातून मलमपट्टी घेतली. तिथे एका हॉटेलमध्ये चेक-इन केले कपडे बदलून १६ मिनिटातच बाहेर पडले. आफशाकने दिलेल्या माहितीनुसार, दोघांनाही लखनऊला जाऊन पोलीसांच्या हवाली व्हायचे होते.

 

नागपूरहून मिळणार होती सर्व मदत

पोलीसांना जाऊन हेच सांगायचे होते की, जो आमच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवेल त्याचे असेच परिणाम होतील. याच कारणामुळे त्यांनी आपली सर्व मुळ ओळखपत्रे सर्व ठिकाणी सोबत बाळगली होती. लखनऊमध्ये जाऊन पत्रकारांसमोर ही माहिती देण्याची योजना त्यांनी आखली होती. मात्र, हल्ल्यामध्ये जखमी झाल्याने त्यांनी तसे करणे टाळले. यावेळी नागपूरला असलेल्य असिम अली आणि सूरत येथील रशीद सोबत चर्चा करत बरेलीला जाण्याचा निर्णय घेतला. असिमने सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले होते.

 

आणखी चारजण होते निशाण्यावर

आशफाकने दिलेल्या माहितीनुसार, हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी, उत्तर प्रदेश अध्यक्ष गौरव गौस्वामी, सुरत येथील एक नेते आणि विरोधात वक्तव्य देणारे आणखी एक नेते त्यांच्या निशाण्यावर होते.

@@AUTHORINFO_V1@@