
जम्मू-काश्मीरमध्ये बीडीसी निवडणुका शांततेत पार , लोकशाहीवर लोकांचा अतूट विश्वास आहे : पंतप्रधान मोदी
श्रीनगर : जम्मू आणि काश्मिरमध्ये गट विकास परिषदेच्या ३०७ अध्यक्षांची निवड करण्यात आली. गट विकास परिषदेचा निवडणुकीचा अंतिम निकाल मुख्य निवडणूक अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी काल जाहीर केला. या निवडणुकीत २१७ अपक्ष तर भारतीय जनता पार्टीचे ८१ उमेदवार निवडून आल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीसाठी काल राज्यात शांततेत मतदान झाले होते. त्यापैकी बिनविरोध २४ गटांवर उमेदवार विजयी झाले आहेत. कलम ३७० व ३५ ए हटविल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील बीडीसी निवडणुका शांततेत पार पडल्या. रियासीच्या १२ ब्लॉकपैकी १० ब्लॉकमध्ये १०० टक्के मतदान नोंदविण्यात आले. सकाळी दहा वाजता मतदानास प्रारंभ झाला जो दुपारी एक वाजता संपला. जम्मू-काश्मीरमधील बीडीसी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. राष्ट्रीय परिषद, पीडीपी आणि कॉंग्रेसने बीडीसी निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
I congratulate all those who have emerged victorious in the BDC polls across Jammu, Kashmir, Leh and Ladakh.
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2019
This marks the dawn of a new and youthful leadership across the regions, which will make a monumental contribution to national progress in the times to come.