केंद्र सरकारचा मोठा निर्णय : MTNL-BSNL आता एकच कंपनी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2019
Total Views |




नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवारी सरकारी दूरसंचार कंपन्यांचे विलीनिकरण करण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे. दोन्ही कंपन्यांचे एकूण ३७ हजार कोटींचे भागभांडवलाचे मौद्रिकीकरण करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना आकर्षक निवृत्ती वेतन योजना देण्यात येणार आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएलला 4-जी स्पेक्ट्रम देण्याबद्दलही सहमती देण्यात आली आहे.

 

बीएसएनएल आणि एमटीएनएलला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी ७४ हजार कोटींच्या गुंतवणूकीची आवश्यकता असल्याचे मत दूरसंचार निगम विभागाने म्हटले होते. हा प्रस्ताव निर्मला सितारामण यांनी फेटाळला होता. त्यामुळे या कंपन्या बंद होणार अशा चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन्ही कंपन्यांना उभारी देण्यासाठीच्या योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. सरकार विलिनिकरण योजनेवर काम करत असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@