कठुआ बलात्कार प्रकरण : एसआयटीच्या सदस्यांवर गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2019
Total Views |



नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कठुआ बलात्कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या 'विशेष तपास पथका'मधील (एसआयटी) ६ सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश स्थानिक न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्यावर खोटी साक्ष देण्यासाठी साक्षीदारांवर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे.

 

कठुआ येथे ८ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्यानंतर अमानुष अत्याचार करत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेता तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला होता.

 

सचिन शर्मा, नीरज शर्मा आणि साहिल शर्मा या साक्षीदारांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत न्यायदंडाधिकारी प्रेम सागर यांनी जम्मूचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक सचीन शर्मा यांना त्या ६ सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. याचवर्षी जून महिन्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश तेजविंदर सिंह यांनी मुख्य आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी इतर तिघांना ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

@@AUTHORINFO_V1@@