दादाची नवी इनिंग सुरु ; बीसीसीआयचा ३९वा अध्यक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2019
Total Views |


 

 

मुंबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्षपद स्वीकारले. बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयामध्ये बुधवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये दादाची बिनविरोध निवड करण्यात आली. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली या दोन नावांची चर्चा होती. मात्र, १४ ऑक्टोबर रोजी केवळ सौरव गांगुलीनेच अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला होता.

 

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळ बुधवारी २३ ऑक्टोबरला संपुष्ठात आला. त्यामुळे याचदिवशी सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्याच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभाही बुधवारी पार पडली. तसेच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह याची बीसीसीआयच्या सचिवपदी निवड करण्यात आली. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमाळ यांची बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी निवड झाली.

@@AUTHORINFO_V1@@