
प्यार बिना चैन काही रे...हे गाणे प्रत्येकानेच एकदा तरी नक्कीच ऐकले असेल. हिंदी सिने सृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ गायक बप्पी लाहिरी यांचे वैशिष्ट्य असेलेल्या डिस्को बिट असलेल्या गाण्यांनी भारतालाच नाही तर भारताबाहेरील कलाकारांना देखील वेड लावले आहे. त्यामुळे आता त्यांच्या या गाण्याला एक हटके टच देत बप्पी लाहिरी आणि हॉलिवूडमधील एक प्रचंड लोकप्रिय असलेली लेडी गागा हे २ डुएट गाण्यांसाठी एकत्र गाणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले. यामध्ये बप्पी लाहिरी हिंदी आणि लेडी गागा इंग्लिशमध्ये या गाण्याचे सादरीकरण करणार आहेत. या आनंदाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Lokah Samastah Sukhino Bhavantu
— Lady Gaga (@ladygaga) October 19, 2019
शिवाय लेडी गागाने काही दिवसांपूर्वी चक्क संस्कृतमध्ये ट्विट करून देशभरातील सगळ्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. आता या नवीन बातमीमुळे एक वेगळाच अनुभव लवकरच सर्व प्रेक्षकांना घेता येणार आहे. दरम्यान बप्पी यांची अनेक जुनी गाणी आत्तापर्यंत खूप मोठ्या मोठ्या डीजे प्लेयर्सनी रिमिक्स केली आहेत ज्यांना प्रेक्षकांनी खूप मोठ्या प्रमाणावर पसंती देखील दर्शवली आहे. त्यामुळे आता या आगामी गाणी ऐकण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. साधारण या वर्षाच्या शेवटी ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येतील असे सांगण्यात येत आहे.