भारतीय लष्कराची मोठी कामगिरी : कुख्यात दहशतवादी हमीद ललहारी ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2019
Total Views |



जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरमधील अवंतिपुरा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये भारतीय लष्कराला ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. त्यामध्ये दक्षिण काश्मीरमध्ये झालेल्या कारवाईत अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या गजवत- उल- हिंदचा म्होरक्या हमीद ललहारी याचा खात्मा करण्यात आला आहे.

 

ठार करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांकडून एके-४७ ताब्यात घेण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी जाकिर मूसाचा खात्मा झाल्यानंतर गजवत-उल-हिंदचा कमांडर म्हणून ललहारीची नेमणूक करण्यात आली होती. तो मुळचा पुलवामामधला रहिवासी होता.

@@AUTHORINFO_V1@@