उत्तर द्यावेच लागेल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Oct-2019   
Total Views |





काश्मीर खोर्‍यातील आरती टिक्कू सिंह यांनी हे प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित केले.
दक्षिण आशियातील मानवाधिकारया विषयाबद्दल झालेल्या सुनावणीत त्यांनी प्रश्न उपस्थित करत एका मोठ्या विषयाला वाचा फोडली. पाकिस्तानमध्ये पत्रकार बुखारी यांच्या हत्याप्रकरणाचाही त्यांनी जाब विचारला. ही मानवाधिकारांची गळचेपी नाही का?, या पातळीवर जाऊन असे विचारणे आज आवश्यकच होते.



गेली ३० वर्षे दहशतवाद फोफावतोय, जिहाद, कट्टरतावाद, दहशतवाद, धर्मांतरण असो किंवा सीमेपलीकडून सुरू असणार्‍या कारवाया, पाकिस्तानच्या भूमीतून सुरू असलेल्या या नापाक कुरापतीच नेमक्या मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या नजरेतून कशा सुटू शकतात? लष्कर-ए-तोयबाने पत्रकार शुजात बुखारी यांची केलेली हत्या, याच संघटनेने मुंबईत केलेला दहशतवादी हल्ला, या सर्व गोष्टींवर आंतरराष्ट्रीय पत्रकार गप्प का? याचे उत्तर द्यावेच लागेल.काश्मीर खोर्‍यातील आरती टिक्कू सिंह यांनी हे प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित केले. दक्षिण आशियातील मानवाधिकारया विषयाबद्दल झालेल्या सुनावणीत त्यांनी प्रश्न उपस्थित करत एका मोठ्या विषयाला वाचा फोडली. पाकिस्तानमध्ये पत्रकार बुखारी यांच्या हत्याप्रकरणाचाही त्यांनी जाब विचारला. ही मानवाधिकारांची गळचेपी नाही का?, या पातळीवर जाऊन असे विचारणे आज आवश्यकच होते.


आंतरराष्ट्रीय माध्यमांवर सडकून टीका करताना त्यांनी आत्तापर्यंतचे सर्व हिशोब चुकते केले होते. कारण, पुलवामा हल्ला असो किंवा कलम ३७०, ज्या प्रकारे विदेशी प्रसारमाध्यमांनी भारताविरोधात ‘अजेंडा’ तयार करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला त्याच मंचावर जाऊन उत्तर मिळाले आहे. त्या इथवरच थांबल्या नाहीत, आरती यांनी विदेशी प्रसारमाध्यमांना पाकिस्तानातील या दहशतवादी कारवायांविरोधात आवाज उठवण्याचेही आवाहन केले. पत्रकारितेच्या नैतिकतेचाच तो भाग असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. तसेच त्यांच्या या वागणुकीला ‘दूषित पत्रकारिता’ही म्हणत चांगलीच चपराक लगावली, हे लक्षणीय होते. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या बालाकोट हवाईहल्ल्याचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्यासाठी परदेशी वृत्तमाध्यमे पोहोचली. हल्ला झालाच नाही. ‘जैश’चे तळ उद्ध्वस्त झालेच नाहीत, हे सांगण्याचा चंग बांधून या सार्‍याला ‘फॅक्ट चेक’ असे गोंडस नावही देण्यात आले होते. मात्र, भारताकडून हे पाऊल ज्या कारणासाठी उचलले गेले, त्याचे मुख्य कारण पुसण्याचे कामही यावेळी करण्यात आले होते.



‘काश्मीर खोर्‍यात कलम ३७० नंतर सुरू असणारी अशांतता’, या मथळ्याच्या बातम्या पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी जोरदार चालवल्या. आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही त्याचीच ’री’ ओढली होती. मात्र, त्यापूर्वी होणारे सैनिकांवरील हल्ले, सुरक्षाबलांवरील दगडफेक याबद्दल मात्र सारे थंडच! आरती टिक्कू सिंह यांनी अशाच एककल्ली वृत्तीचा समाचार घेतला आणि तो घेणे गरजेचेच होते. दहशतवाद्यांनी शांततेसाठी हे सारं काही केलं होतं, तर मग शांती मिळाली का? असेही त्यांनी विचारले. काश्मिरी पंडितांसोबत झालेल्या अत्याचाराला वाचा फोडत असताना त्यांनी काश्मीर खोर्‍यातील दहशतवादी कारवायांमुळे सर्वात जास्त मुस्लीम समाज यापासून प्रभावित झाल्याचेही अधोरेखित केले.



अमेरिकन काँग्रेस आणि पाकिस्तानला त्यांचे हे वक्तव्य चांगलेच वर्मी लागले
. अमेरिकेच्या काँग्रेसकडून ही सुनावणी पक्षपातीपणे चालवली जात असल्याचे सांगत त्यांनी ही सुनावणी पक्षपाती असल्याचे खडेबोलही सुनावले. १५ हजार मुस्लीम काश्मिरी जे आत्तापर्यंत या दहशतवादी कारवायांमध्ये मारले गेले, तीन लाख काश्मिरी पंडित ज्यांना जातीय दंगलीमुळे तिथून पाय काढावा लागला, १९९० पूर्वी काम करणारे ७०० मुस्लीम पंडित असो किंवा मुस्लीम असोत या सार्यांबद्दल पूर्वग्रहदूषित ठेवून ही सुनावणी सुरू होती, असे परखड मतही आरती यांनी मांडले.



ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे या सार्‍याचे वृत्तांकन करतात
, ती एक विकृती असल्याची टिप्पणीही त्यांनी केली. पाकिस्तानसह अमेरिकन काँग्रेसचा हा पक्षपाताचा बुरखा फाडल्याबद्दल त्यांचे भारतात सर्वत्र कौतुक होत आहे. काश्मीरच्या नंदनवनात आत्ता कुठे शांतता प्रस्तावित होऊ लागली आहे. भारतातील दहशतवाद्यांचा शिरकाव आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. यामुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानने आपल्या कुरापती अजूनही बंद केलेल्या नाहीत. मग त्याबद्दलची विदेशात होणारी निदर्शने असोत किंवा विदेशी माध्यमांचे वृत्तांकन, या सार्‍या पार्श्वभूमीवर आरती टिक्कू सिंह यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर तर द्यावेच लागेल.

@@AUTHORINFO_V1@@