जम्मू-काश्मीर, लडाखमधील सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2019
Total Views |


 


जम्मू : कलम ३७० लागू केल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने दिवाळी भेट दिली आहे. केंद्र सरकारच्या आस्थापनांतील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्यामुळे आता या वेतन आयोगानुसार लागू होणारे सर्व भत्ते कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. मंगळवारी मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व भत्त्यांचा लाभ ३१ ऑक्टोबर 2019 पासून मिळेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक आदेश जारी केले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेश आणि लद्दाखच्या केंद्रशासित प्रदेशातील सरकारी कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगानुसार भत्ते देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्यासह, वाहन भत्त्यातही वाढ केल्याने याचाही फायदा जम्मू काश्मीर आणि लडाख येतील कर्मचाऱ्यांना होईल.

@@AUTHORINFO_V1@@