अभिजीत बॅनर्जी यांचा पत्रकारांना टोला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्व बारीक गोष्टींवर नजर असून त्यांना सर्व बाबींची माहिती असते, असे प्रतिपादन मंगळवारी नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी केले. अर्थशास्त्रातील २०१९ नोबेलचे मानकरी ठरलेले भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोघांमध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. या भेटीनंतर अभिजीत बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी मला माध्यमांपासून सावध राहण्यास सांगितले आहे. प्रसारमाध्यमे तुम्हाला माझ्या विरोधात बोलायला भाग पाडतील,’ असे त्यांनी हसत-हसत बजावल्याचे माहिती बॅनर्जी यांनी सर्वांसमोर सांगितले.


बॅनर्जी पुढे म्हणाले
, “तुम्ही माझ्याकडून काय वदवून घेऊ इच्छिता हे माझ्या लक्षात आले आहे. पंतप्रधानांनी आधीच मला या गोष्टीची कल्पना दिली. त्यांच्याशी आज माझी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. सुरुवातीलाच त्यांनी हसत-हसत मला मीडियापासून सावध राहण्याचा सल्ला दिला. तुम्ही माझ्याविरोधात वक्तव्य करावे म्हणून माध्यमे प्रयत्न करतील, असेही त्यांनी सांगितले. अभिजित पुढे म्हणाले, ” पंतप्रधान टीव्ही पाहतात. प्रत्येक गोष्टीवर त्यांची नजर असते. माध्यमांना ते पाहतात. तुम्ही आता कुठल्या प्रयत्नात आहात हेही त्यांना माहीत आहे. देशातील बँकिंग क्षेत्राची स्थिती सध्या गंभीर आणि भीतीदायक आहे. सरकारने याची दखल घ्यायला हवी. बँकिंग व्यवस्थेमध्ये तातडीच्या व महत्त्वाच्या बदलांची गरज आहे,’ असे ते म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@