"नशीब हे बलात्कारासारखं असतं विरोध करू शकत नसाल तर आनंद घ्या !" - कॉंग्रेस खासदाराच्या पत्नीची फेसबूक पोस्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2019
Total Views |
 


तिरुवनंतपुरम : "नशीब हे बलात्कारासारखं असतं विरोध करू शकत नसाल तर आनंद घ्या !", अशी धक्कादायक फेसबुक पोस्ट कॉंग्रेस खासदार हिबी एडन यांच्या पत्नीने केली आहे. या प्रकारानंतर नेटीझन्सकडून टीका झाल्यानंतर अन्ना लिंडा एडन यांना चांगलेच सुनावले. स्वतः पत्रकार असूनही असे वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.



 

 
 
 

कोची येथे त्यांच्या घराजवळ पाणी तुंबल्याचा व्हीडिओ आणि पतीसह आयस्क्रीम खातानाचा फोटो त्यांनी शेअर केला होता. त्याला त्यांनी ही कॅप्शन दिली होती. मात्र, हा प्रकार अंगलट आल्याने त्यांना दुसऱ्या पोस्टद्वारे माफी मागावी लागली. बलात्कारपीडित महिलांबद्दल असे विधान केल्याच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान आपल्या पोस्टमध्ये मला बलात्कारपीडितांच्या भावना दुखावायच्या नव्हत्या, असेही त्या म्हणाल्या.

 
@@AUTHORINFO_V1@@