राज्यात ६० टक्के, तर मुंबईत सरासरी ५० टक्के मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2019
Total Views |




मुंबईत मतदान शांततेत

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनिमित्त राज्यभरात ६०.५ टक्के तर मुंबई शहर मतदारसंघात ५० टक्के तर मुंबई उपनगरात सरासरी ४५.४८ टक्के मतदान झाले. उपनगरासह मुंबईभरात मतदान शांतते पार पडले.

 
सोमवारच्या मतदानावर पावसाचे सावट असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली होती. मात्र दुपारी ढळढळीत उन पडल्याने मुंबई शहर जिल्हा आणि उपनगर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत असताना साडेचार वाजताना पुन्हा पावसाचे सावट दाटून आले होते. मात्र मतदारांच्या मतदानाच्या इच्छाशक्तीपुढे वरुणराजानेही माघार घेतली.


लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक असल्याने लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम मतदारांकडून दुर्लक्षित झाला नव्हता. त्यामुळे यावेळीही मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांपुढे रांगा लावल्या होत्या. सकाळी मतदानाची टक्केवारी काहीशी चिंताजनक होती. मात्र दुपारी अकरा वाजल्यानंतर टक्केवारीत वाढ होत गेली.


सध्याचे वातावरण संमिश्र आहे. कधी उन्ह, तर कधी पाऊस अशा खेळ चालू आहे. मात्र त्याचा मतदारांना त्रास होऊ नये आणि मतदानावर परिणाम होऊ नये निवडणूक यंत्रणेने मोठी काळजी घेतली होती. इमारतींच्या पुढे मंडप घालण्यात आले होते. त्यामुळे रांगा लावण्यात मतदारांना कोणतीही येत नव्हती.


मुंबई शहर जिल्ह्यात 6 वाजेपर्यंत सरासरी 50 टक्के मतदान झाले. या झालेल्या मतदाना बद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी मतदारांचे आभार मानले.


मुंबई शहरात निवडणूक मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेने कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता सुरळीत पार पाडली. मतदान यादीबाबत तक्रारी आल्या नाहीत. मतदारांना मतदान चिठ्ठी घरपोच देण्यात आल्या होत्या तसेच मतदान केंद्रावर मदतकक्ष स्थापन करण्यात आले होते. मतदान केंद्रावर मतदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्याचा लाभ मतदारांनी घेतला. मतदान प्रक्रिया सुलभ आणि शांततेत संपन्न झाली असे जोंधळे यांनी सांगितले.


मुंबई उपनगरातही मतदान सुरळीत पार पडले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान झाले होते. विक्रोळीत सर्वाधिक,तर वांद्रे पूर्व मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले. अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी ६ वाजल्यानंतरही मतदान प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.


@@AUTHORINFO_V1@@