दुखवटा बाजूला सारून बजावला मतदानाचा हक्क

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2019
Total Views |



वडिलांचे अस्थी गोळा करून गाठले मतदान केंद्र

बदलापूर, दि. २१ (प्रतिनिधी)- लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी शासकीय पातळीवरून जनजागृती केली जाते, तरीही यादिवशी सुट्टी म्हणून पहाण्याचा दृष्टिकोन बळावत असताना बदलापूरजवळील एका परिवारात दुःखद घटना घडली त्याचे दुःख असूनही मतदानाचा पवित्र अधिकार बजावण्याबरोबरच नवा आदर्श घालून दिला आहे.




(शोकसागरातील म्हात्रे कुटुंबीय मतदान केंद्रावर गेलेले असताना )
बदलापूरजवळील वडवली गावातील पांगळू झिपरू म्हात्रे (८५) यांचे रविवारी हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले . त्यामुळे संपूर्ण म्हात्रे कुटूंब दुःखात बुडाले होते, रविवारी रात्री उशिरा पांगळू म्हात्रे यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला आणि आज सोमवारी (२१) रोजी सकाळी त्यांच्या अस्थी गोळा करण्याचा विधी होता . सोमवारी मतदानाचा दिवशी पांगळू म्हात्रे यांच्या सातही मुलांनी आपल्या वडिलांच्या अस्थी गोळा करून मतदान केंद्र गाठले आणि मतदान केले . कुटुंबातील एखादा सदस्याचे निधन झाल्यावर १३ दिवस दुखवटा पाळला जातो . या काळात कोणीही कोणाकडे जात येत नाहीत. मात्र म्हात्रे कुटूंबात ५२ सदस्यांनी आज सर्व दुखवटा बाजूला सरून त्यांनी मतदान केलं. तसेच प्रत्येकाने मतदानाचा अमूल्य हक्क बजावला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@