मतदान करा, नाहीतर नंतर तक्रारी करू नका - गुलज़ार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2019
Total Views |



ज्येष्ठ गीतकार आणि कवी गुलज़ार यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मतदानाविषयीचे आपले मत व्यक्त केले. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने मतदान केले पाहिजे आणि जर तसे केले नाही तर त्यांना तक्रारी करण्याचा अधिकार असणार नाही असे म्हणत त्यांनी सर्वांनाच मतदान करण्यास आवाहन केले. ऑस्करप्राप्त गीतकार गुलज़ार यांनी पुढे बोलताना भारतातील तरुण मतदारांनी जबाबदारीची जाणीव ठेवून मतदान करावे असे म्हटले आहे.

दरम्यान आज महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून महाराष्ट्रात सर्वत्र मदनाला सुरुवात झाली आहे. तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि आपल्या महाराष्ट्राचे भवितव्य पेटीमध्ये बंद होईल. त्यामुळे आता कोण निवडून येईल? आपल्या महाराष्ट्राच्या विकासाला या मतदानानंतर चालना मिळेल का? असे अनेक प्रश्न सध्या सर्वांनाच पडले आहेत. मात्र या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे.

२८८ जागांसाठीच्या या महाराष्ट्राच्या रणधुमाळीमध्ये भाजपचे १६४ उमेदवार, शिवसेनेचे १२६, काँग्रेस १४७ तर राष्ट्रवादीचे १२७ उमेदवार रिंगणात आहेत. येत्या २४ ऑक्टोबरला गुलदस्त्यात असलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे उघड होणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@