दबंग ३: रज्जो इस बॅक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2019
Total Views |


दबंग आणि दबंग २ च्या धमाकेदार कामगिरीनंतर रज्जो म्हणजेच दबंग ३ मधील सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. आणि म्हणूनच 'रज्जो इस बॅक' असे म्हणत आगामी चित्रपट 'दबंग ३' मधील रज्जोच्या भूमिकेची झलक उलगडणारा ट्रेलर आज प्रेक्षकांसमोर आला.

'दबंग ३' च्या या ट्रेलरमध्ये चित्रपटातील चुलबूल पांडे अर्थात सलमान खानने नेहेमीप्रमाणे त्याच्या हटके अंदाजात रज्जोच्या भूमिकेची ओळख करून दिली आहे. शिवाय चित्रपट प्रदर्शनाला आता फक्त थोडासाच काळ बाकी असल्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आता हा ट्रेलर पाहून शिगेला पोहोचली आहे.

डान्सचा बादशहा प्रभू देवा दिग्दर्शित 'दबंग ३' येत्या २० डिसेम्बरला प्रदर्शित होईल. या चित्रपटाला स्वतः सलमान खान, अरबाज खान आणि निखिल द्विवेदी यांचे अर्थसहाय्य मिळाले आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिंह यांची केमेट्री आधीच्या दोन्ही चित्रपटांमध्ये प्रेक्षकांनी पहिलीच आहे आणि त्याला भरभरून पसंती सुद्धा दिली आहे. आता तीच केमेस्ट्री पुन्हा एकदा पाहण्यासाठी आता प्रेक्षकांना थोडाच काळ वाट पाहावी लागेल.

@@AUTHORINFO_V1@@