भारतीय गोलंदाजांसमोर आफ्रिका भुईसपाट : ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटीमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही आफ्रिकेची दैना उडाली. दुसरा दिवस रोहित आणि रहाणेच्या शतकांनी गाजवल्यानंतर तिसरा दिवस मात्र गोलंदाजांनी गाजवला. भारताने ४९७ वर डाव घोषित केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावामध्ये फक्त १६२ धावांवर सर्व बाद झाला. यामध्ये उमेश यादवच्या भेदक माऱ्याने ३ फलंदाज बाद केले, तर आफ्रिकेचे ३ फलंदाज वगळता एकालाही दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही.

 

भारताचा पहिला डाव ४९७ वर घोषित केल्यानंतर 'आफ्रिकेचा संघ सर्व बाद १६२' एवढाच फलक उभारता आला. आफ्रिकेच्या पहिल्या डावामध्ये जुबेर हमजा, टेम्बा बऊमा आणि जॉर्ज लिंडे वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. हे ३ फलंदाज वगळता भारताला एकाही फलंदाजाने १० चा आकडा पार केला नाही. भारतीय गोलंदाजांमध्ये उमेश यादवने सर्वाधिक ३ बळी घेतले तर जडेजा, नदीम आणि शमीने प्रत्येकी २ बळी घेत आफ्रिकेचे कंबरडे मोडले.

 

भारताने फॉलो ऑन दिल्यानंतरदेखील आफ्रिकेला संयमी खेळी करता आली नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आफ्रिकेने २६ धावांवर ४ गाडी गमावले होते. यादवने क्विंटन डिकॉकचा पहिला बळी घेतला. त्यानंतर आफ्रिकेच्या ३ फलंदाजांना शमीच्या अचूक आणि भेदक माऱ्यासमोर झुकावे लागले.

@@AUTHORINFO_V1@@