बॅंकांची दिवाळी भेट !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Oct-2019
Total Views |
 


नवी दिल्ली : जर तुम्ही या दिवाळीत नवे घर, गाडी किंवा आणखी काही खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर बॅंकांतर्फे तुमच्यासाठी खुशखबर आहे. २१ ऑक्टोबरपासून एसबीआयसह एकूण १८ सरकारी बॅंकांतर्फे दुसऱ्यांदा कर्ज देण्यासाठी महाशिबिर आयोजित करत आहेत. २५ ऑक्टोबरपर्यंत हे शिबिर सुरू राहणार असून यासाठी ठिकठिकाणी कॅम्प घेतले जाणार आहेत. याद्वारे कर्ज आणि इतर सुविधा ग्राहकांना देण्यात येणार आहेत.

चारशे जिल्ह्यांमध्ये कर्जवाटप

भारतीय स्टेट बॅंकेने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका या कार्यक्रमात सहभागी होतील. देशभरातील एकूण चारशे जिल्ह्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे. काही दिवसांपूर्वी बॅंकांनी अशाच प्रकारचे शिबीर राबवले होते. या काळात बॅंकांतर्फे नऊ दिवसांत ८१ हजार ७०० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. १ ऑक्टोबरपासून अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आला होता. केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून बॅंकांना तसे निर्देश देण्यात आले आहेत.

 

या सेवा मिळणार

ग्राहकांना वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, कृषि कर्ज, दुचाकी व चार चाकी वाहनासाठी कर्ज, सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी कर्ज देण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्यांना आणि घर व वाहन खरेदीदांना याचा फायदा मिळणार आहे.




 

या बॅंकांतर्फे मिळणार सेवा

दुसऱ्या टप्प्यातील उपक्रमात एसबीआय, बॅंक ऑफ बड़ोदा, युनियन बॅंक, यूको बॅंक, सिंडिकेट बॅंक, कॅनरा बॅंक, ओरिएंटल कॉमर्स बॅंक, युनायटेड बॅंक ऑफ इंडिया, इंडियन ओवरसिस बॅंक, पंजाब एण्ड सिंध बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, पीएनबी, बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आंध्रा बॅंक, इलाहाबाद बॅंक आदी बॅंकांचा त्यात सामावेश आहे.


बॅंकांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

@@AUTHORINFO_V1@@