भारताने शिकवला पाकिस्तानला धडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Oct-2019
Total Views |


श्रीनगर : शस्त्रसंधीच्या नियमांचे उल्लंघन करून वारंवार गोळीबार करणार्‍या पाकिस्तानला रविवारी भारताने चांगलाच धडा शिकवला. भारतीय लष्कराच्या जवानांनी रविवारी पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई केली. यावेळी भारतीय लष्कराच्या जवानांनी २२ दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी प्रयत्नशील असणार्‍या ११ पाकिस्तानी सैन्याचाही खात्मा केला. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे आणि पाकिस्तानी सैन्याचे तळ उद्ध्वस्त करत भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा अद्दल घडवली आहे.


जम्मू
-काश्मीरमधून ‘कलम ३७०’ हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय भारताने घेतल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार सीमेपलीकडून गोळीबार सुरू आहे. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीच्या नियमांचे उल्लंघन करून गोळीबार करण्यात येतो. शनिवारी रात्रीही पाकिस्तानने पुन्हा तोच कित्ता गिरवला. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. यानंतर मात्र भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानी सैन्याला प्रत्युतर देण्याचा निर्णय घेतला आणि गोळीबार सुरू केला. यावेळी भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करत २२ दहशतवाद्यांचा खात्मा केलाच. याशिवाय ११ पाकिस्तानी सैनिक आणि त्यांचे काही तळही उद्ध्वस्त केले.

@@AUTHORINFO_V1@@