Shame On NCP : नेटीझन्सनी धनंजय मुंडेंना झोडपले

    20-Oct-2019
Total Views |




मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राज्याच्या ग्रामविकास व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा नेटीझन्सनीही चांगलाच समाचार घेतला आहे. महिला कल्याणाचा आव आणत महिलांबद्दल स्वतःच्याच बहिणीबद्दल असे वक्तव्य करणारा, असा भाऊ कुणालाही न मिळो अशा भावना ट्विटरवर व्यक्त करून धनंजय मुंडेंनाही चांगलेच फैलावर घेण्यात आले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेससारख्या पक्षाच्या नेत्याचे स्वतःच्याच बहिणीबद्दलचे हे विधान अत्यंत वेदनादायी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

 

धनंजय मुंडे यांनी तो व्हीडिओ डिलिट का केला ?

धनंजय मुंडे म्हणतात की त्या व्हीडिओला एडीट करण्यात आले आहे तर तो व्हीडिओ त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून डिलीट का करण्यात आला, असा सवाल आता महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केला आहे. रहाटकर यांनी याबद्दल आक्षेप नोंदवत मुंडे यांच्या म्हणण्याप्रमाणे या व्हीडियोची फॉरेन्सिक तपासणी केलीच पाहीजे, अशी मागणीही केली आहे. निवडणूक आयोगानेही या प्रकरणी कारवाई करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.