२० तासांनी पंकजा मुंडे पत्रकारांसमोर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Oct-2019
Total Views |




परळी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार धनंजय मुंडे यांनी भरसभेत पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर परळीतील राजकारण तापले आहे. पंकजा मुंडे तब्बल २० तासांनी पत्रकारांसमोर आल्या. मात्र, कोणतीही प्रतिक्रिया देणे त्यांनी टाळले आहे. पंकजा मुंडेंविरोधातील या वक्तव्यामुळे परळीमध्ये संतत्प वातावरण आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात राज्यभर निदर्शने केली जात आहेत. धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानाबाहेरही महिलांनी ठिय्या मांडला आहे.

 

दरम्यान, खासदार प्रितम मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दलच्या वक्तव्याबद्दल धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. रविवारी दुपारी 'यशश्री' समोर जमलेल्या महिलांशी याबद्दल प्रतिक्रीया देताना त्या म्हणाल्या, "मला राजकारण सोडावसं वाटतंय. आम्ही खिन्न आहोत. आता सगळं सहन करण्यापलीकडे गेलं आहे. सगळ्या गोष्टी राजकारणाच्या नसतात. धनंजयचे बोलणे ऐकवत नाही. गलिच्छ आणि घाणेरड्या राजकारणाचा आता कंटाळा आला आहे. तुमचे-आमचं नातें निवडणुकीपुरते नाही'', असे सांगताना खासदार प्रितम मुंडे यांना भावना अनावर झाल्या. 'गोपीनाथ मुंडे असते, तर असे बोलण्याची कुणाची हिंमत झाली नसती. रक्ताचा भाऊ जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तेव्हा सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल,' असेही प्रितम मुंडे यांनी यावेळी सांगितले.

 

पंकजा मुंडे यांच्याविषयी सांगताना त्या म्हणाल्या "इतक्या खालच्या पातळीवर जाऊन धनंजय बोलला. अनेक दु:खे आली. खंबीरपणे त्याला सामोऱ्या गेल्या. त्या कधीही खचल्या नाही. काहीही केले तरी त्या खचत नाही हीच त्यांची पोटदुखी आहे. इतक्या खालच्या पातळीवरील टीका ऐकूनही त्या खचल्या नाहीत. मात्र, त्या उद्विग्न झाल्या आहे. मी त्यांना या आधी एवढे उद्विग्न झालेले पाहिले नाही.
@@AUTHORINFO_V1@@