ट्विटर डाऊन !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2019
Total Views |


 


मुंबई : सोशल नेटवर्कींग साईट ट्विटर मंगळवारी रात्रीपासून डाऊन झाल्याने अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक अकाऊट युझर्सनी या संदर्भात तक्रार केली आहे. ट्विटरच्या अधिकृत हॅंडलवरून दिलेल्या माहितीनुसार, अनेकांना ट्विट करण्यासाठी अडचणी येत आहेत. दरम्यान ट्विटरवर नोटीफीकेशनही येत नसल्याची तक्रार युझर्सने केली आहे. तसेच हॅशटॅग आणि ट्रेंडींग गोष्टीही दिसत नाहीत.



 

एकूण चार हजार युझर्सनी त्यांना अशा अडचणी येत असल्याचे म्हटले आहे. ट्विटरने आम्ही लवकरच यावर तोडगा काढू, असे म्हटले आहे. युझर्सना ट्विट करण्यात अडचणी येत आहेत. पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही ट्विट सेंड होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@