राष्ट्रपित्याला नमन...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2019
Total Views |
 


नवी दिल्ली : "आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी कटीबद्ध आहोत. त्यासाठी आम्ही संकल्प सोडला आहे. विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या या महापुरुषाला नमन", या शब्दांत महात्मा गांधींना आदरांजली वाहीली. कष्टाविना संपत्ती, अंतरात्म्याविना उपभोग, चरित्राविना अर्जित ज्ञान, नैतिकतेविना व्यापार, मानवतारहीत विज्ञान, त्यागाविना सिद्धांत या गोष्टींपासून दूर राहण्याचे विचार गांधींनी दिल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

 

देशभरात महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची ११६वी जयंती आहे. यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.



 

 

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, हरदीपसिंह पुरी, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना राजघाटावर पुष्पांजली अर्पण केली.


 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहताना, आपण सारेजण मिळून आपल्या दैनंदिन जीवनात गांधीवादी सिद्धांतांना आचरणात आणू - व्यंकैय्या नायडू, उपराष्ट्रपती






मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन केले. स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यास तसेच या कार्यात हातभार लावण्यास मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले आहे. 

 

 

@@AUTHORINFO_V1@@