गुजराती, कन्नड नव्हे तर 'या' पोस्टरमुळे आदीत्य जास्त 'ट्रोल'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2019
Total Views |





मुंबई : शिवसैनिकांसमोर 'हीच ती वेळ' म्हणत आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून लढण्याची घोषणा केली खरी मात्र, ते ट्रोल झाले मराठीच्याच मुद्द्यावरून... गुजराती, हिंदी, इंग्रजी, मराठी आणि कन्नड भाषेतून पोस्टर दिसल्यावर जितके ट्रोल केले गेले नाही, त्याहून जास्त टीका त्यांच्यावर उर्दू भाषेतील पोस्टरमुळे झाली आहे. गुजराती आणि दाक्षिणात्य मतदारांना सेनेनेजवळ केलेच होते. मात्र, आता शिवसेना मुस्लीम मतांचेही राजकारण करत असल्याची टीकाही शिवसेनेवर केली जात आहे. अनेकांनी ही 'नवी शिवसेना' आहे, असा टोलाही आदित्य यांना लगावला आहे.



 

आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिलेच निवडणूक उमेदवार आहेत. यापूर्वी राज ठाकरे यांनी तशी घोषणा केली होती. मात्र, त्यांनी आपल्याच घोषणेपासून फारकत घेतली. आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार की नाही, या मुद्दांवर राजकीय वर्तूळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान, वरळी मेळाव्यात आदित्य यांनी स्वतः विधानसभा लढणार, अशी घोषणा केली होती. त्यापूर्वी वरळीतील राष्ट्रवादीचे नेते सचिन अहीर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन अहीर वरळीतील उमेदवार असतील, अशी अपेक्षा साऱ्यांना होती. मात्र, आदित्य यांनी वरळी मतदार संघात बलाबल वाढवण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले. वरळीतील मतदारांची नस पकडण्याच प्रयत्न आदीत्य ठाकरे यांनी केला आणि त्यांचा पहिलाच प्रयोग फसला.




 

एकेकाळी मराठीच्या मुद्द्यावर आपल्या भाषणांनी शिवाजी पार्क गाजवून सोडणारे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकांपासून नवी शिवसेना फारकत घेत आहे का असाही प्रश्न विचारण्यात आला. शिवसेनेने यापूर्वी मराठी माणसाच्या हक्कांसाठी, भूमीपुत्रांच्या नोकऱ्यांसाठी दक्षिणात्यांविरोधात घेतलेल्या भूमिकांवरूनही आदित्य यांना ट्रोल करण्यात आले आहे. दरम्यान, वरळीची जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठीत मानली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस सुरेश माने यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तर, काका राज ठाकरेही आदित्यविरोधात उमेदवार देणार नसल्याची चर्चा आहे. 





@@AUTHORINFO_V1@@