इस्त्रोच्या शास्त्रज्ञाचा संशयास्पद मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2019
Total Views |


 


हैदराबाद : भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोच्या नॅशनल रिमोट सेंसिंग सेंटरमध्ये (एनआरएसी) कार्यरत शास्त्रज्ञ एस. सुरेश कुमार यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला. पोलीसांनी या प्रकरणी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. त्यांचे कुटूंबीय चेन्नईहून परतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. पोलीसांच्या उपस्थितीत त्यांच्या घराचा दरवाजा उघडण्यात आला.

 

एस सुरेश कुमार (वय ५६) एनआरएसीच्या फोटोग्राफी विभागात अधिकारी होते. त्यांचा मोबाईल घटनास्थळी नाही. त्यांची हत्या ही वैयक्तिक कारणातून झाली असावी, असा पोलीसांना संशय आहे. कार्यालयीन पातळीवर त्यांचे कोणाशिही वाद नव्हते, असे पोलीसांचे म्हणणे आहे. त्यांच्या पत्नी इंदीरा इंडियन बॅंकेच्या चेन्नई शाखेत शाखा व्यवस्थापक आहेत.

 

मुळचे केरळचे असलेले सुरेश कुमार हे गेल्या २० वर्षांपासून हैदराबाद येथे राहत होते. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता ते पावसात भिजत कार्यालयातून घराकडे निघाले होते. मंगळवारी त्यांचे घर आतून बंद होते. कुटूंबियांना त्यांचा फोन लागत नसल्याने शंका आली.

@@AUTHORINFO_V1@@