फक्त इशारे नको!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2019   
Total Views |




अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचे इंडो
-पॅसिफिक क्षेत्राचे साहाय्य सचिव रॅँडल शिलवर यांनी भारताला हा इशारा दिला. तसे पाहता हा भारतासाठी नवा इशारा किंवा धक्कादायक असा खुलासा म्हणता येत नाही. कारण, ‘कलम ३७०’ हटवल्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने सीमावर्ती भागातील कुरापती थांबविल्याच नाहीत.



पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला करण्याचा मनसुबा रचल्याचे अमेरिकन संरक्षण मंत्रालय म्हणते
. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचे इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे साहाय्य सचिव रॅँडल शिलवर यांनी भारताला हा इशारा दिला. तसे पाहता हा भारतासाठी नवा इशारा किंवा धक्कादायक असा खुलासा म्हणता येत नाही. कारण, ‘कलम ३७०हटवल्यानंतर खवळलेल्या पाकिस्तानने सीमावर्ती भागातील कुरापती थांबविल्याच नाहीत. आजही सीमाभागातील वस्त्यांवरील बॉम्बहल्ले, शाळांमध्ये ग्रेनेड हल्ले दैनंदिन आयुष्याचा भाग बनत चालले आहेत. मात्र, खुद्द अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी वक्तव्य केल्याने काश्मीर मुद्द्यात भारताचे पारडे जड होणार आहे. आपल्या वक्तव्यात चीन या प्रकरणी समर्थन करू इच्छिणार नाही, असेही त्यांनी म्हटले. मात्र, चीनच्या या दुहेरी भूमिकेचा फटका भारताला डोकलाम आणि किंबहुना काश्मीरमध्येही बसलाच... पाकिस्तानी दहशतवाद्यांना ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करताना सतत पाकिस्तानची बाजू घेणारा चीन भारतासाठी भूमिका घेईल, अशी शक्यता धूसरच!



आधीच व्यापारयुद्धात कंबरडे मोडलेल्या चीनला आता भारतासोबत स्थिर भूमिका घेणे गरजेचे आहे
. पाकिस्तानला हाताशी धरून भारताविरोधात शड्डू ठोकून उभ्या राहणार्‍या ड्रॅगनला भारताविरोधी उघड भूमिका घेणे आता शक्य नाही. चीनच्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील मोठा हिस्सा हा भारताकडे आहे, पाकिस्तानला गोंजारून तसा आर्थिक फायदा चीनला मिळणे कठीणच. मात्र, तरीही भारताविरोधात उघड भूमिका घेणे चीनला कठीण जाईल, म्हणून शिलवर तसे म्हणाले असावेत. आता मुद्दा पाकिस्तानी अतिरेक्यांच्या घुसखोरीचा आणि दहशतवादी हल्ल्यांचा... ‘कलम ३७०’ हटविल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रणात असलेल्या परिस्थितीला आणि शांततेला भंग करण्याचा प्रयत्न वारंवार झालाभारतीय सैन्यदलाने त्याला चोख प्रत्युत्तरही दिले. त्यामुळे भारताच्या शस्त्रसज्जतेची तुलना ही पाकिस्तानसारख्या देशाशी होऊच शकत नाही. मात्र, कायम पाठीमागून हल्ला करणार्‍या आणि नापाक हरकती करणार्‍या शेजार्‍यांचा इतिहास सोबत असल्याने अमेरिकेचा हा सावधगिरीचा इशारा बरेच काही सांगून जातो. ‘कलम ३७०’ आणि काश्मीरसंदर्भात साम-दाम अवलंबलेल्या इमरान यांच्याकडून नापाकी खेळी नाकारता येत नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणेने आजवर ३५ हून अधिक दहशतवादी कारवायांचा अभ्यास करून काढलेल्या निष्कर्षात अतिरेक्यांची आंतरराष्ट्रीय सीमा भेदण्याची वेळ ही मध्यरात्री २ ते पहाटे ५ असल्याचे निष्पन्न झाले आहे.



चंद्राच्या चांदण्याचा प्रकाश नसेल
, अशी वेळ साधत दहशतवाद्यांकडून सुमारे २०२ किमी लांबीची सीमा पार केली जाते. जीपीएस लोकेशनद्वारे काश्मीर खोर्‍यातील हस्तकांशी संपर्क करतात. दहशतवादी कारवायांना तोंड देण्यासाठी सांबा-जम्मू-उधमपूर आणि सांबा-मनसा-उधमपूर या मार्गाद्वारे मार्गक्रमण करतात. हा प्रवास ट्रक किंवा तितक्या मोठ्या क्षमतेच्या वाहनांतून होेतो. काश्मीर खोर्‍यातील अतिरेक्यांमार्फत या मोहिमेत पुढाकार घेतला जातो. घुसखोरीसाठी अतिरेक्यांना या भागांत पाठवले जाते. त्यामुळे दहशतवाद्यांच्या घुसखोरीची सारी ठावठिकाणे भारताकडे आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे या सार्‍यांची कुंडलीही तयार आहे. गरज आहे ती अमेरिकेसारख्या राष्ट्राने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारताच्या बाजूने कायम उभे राहण्याची. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान वेळोवेळी त्यांच्या भूमीत दहशतवाद पोसल्याची कबुली आंतरराष्ट्रीय मंचावर देतात. दहशतवादाविरोधात लढण्याची भाषाही करतात. मात्र, पाकिस्तानात परतल्यावर दहशतवाद्यांना खुले सोडण्याचे निर्णय घेतात. काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांनी मध्यस्थीची भूमिका घेण्याचे वक्तव्य जरी केले असले तरीही आत्ताचे सरकार हा मुद्दा तिथे घेऊन जाण्यास इच्छुक नाहीच. उलट ‘हाऊडी मोदीकार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला लगावलेली चपराक आणि संयुक्त राष्ट्रातील त्यांचे भाषण बरेच काही सांगून जाते. त्यामुळे दहशतवादाला संपवण्यासाठी केवळ इशारे न देता अमेरिकेने पाक सीमावर्ती भागातील दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.

@@AUTHORINFO_V1@@