स्वच्छतेचा संदेश देत धावली 'मुंबई लोकल'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2019
Total Views |


मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त स्वच्छता आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या तीन विशेष लोकल आज मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावल्या. गांधीजींचे विचार प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी रेल्वेतर्फे हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. स्वच्छता, सत्य आणि अहिंसा हे गांधीजींचे विचार पुढच्या पीढीपर्यंत पोहोचावेत, यासाठी विविध चित्रांद्वारे लोकल सजवण्यात आली.



 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून फलाट क्रमांक सातवरून सकाळी ११.१५ वाजता ठाण्यासाठी एक लोकल निघाली. ती दुपारी १२.११ मिनिटांनी ठाणे स्थानकात पोहोचली. हार्बर मार्गावरून छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणारी ११.२० मिनिटांची लोकल दुपारी १२.०९ वाजता वाशी स्थानकात पोहोचली. दरम्यान, प्रवाशांनीही या उपक्रमाचे कौतूक केले.

 

महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबरपासून देशभरात प्लास्टीक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांनी प्लास्टीक बंदीचे आवाहन करत असताना एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टीकचा वापर टाळा, असे आवाहन देशभरात केले आहे. संपूर्ण देशभरातून प्लास्टीक बंदीला चांगला प्रतिसाद मिळत असून देशभरात याबद्दल जनजागृतीसाठी विविध संस्था आणि विद्यार्थ्यांनी उपक्रम राबवले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@