हनी ट्रॅप स्कँडल : 'कोडवर्ड' वाचून पोलिसही शरमले !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2019
Total Views |






भोपाळ
: मध्य प्रदेशच्या हनी ट्रॅप प्रकरणाची पाने एकामागून एक उलगडत जात आहेत आणि त्यातून समोर येणारे चित्र आणखी धक्कादायक होत आहे. अटक केलेल्या महिलांची चौकशी करता असताना एसआयटी (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम) च्या हाती एक डायरी लागली ज्यामध्ये वसूल केलेली रक्कम आणि थकबाकी तसेच वापरलेल्या कोडवर्डचा तपशील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हनी ट्रॅप प्रकरणात पकडलेल्या पाच महिलांपैकी एक रिव्हेरा टाऊनमध्ये राहते. तिच्याकडे शेकडो व्हिडीओ क्लिप व छायाचित्रे सापडली आहेत, त्याचबरोबर एक डायरीही समोर आली आहे. या डायरीत मागील कित्येक वर्षांचा अहवाल आहे. या डायरीमध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगडशी संबंधित असलेल्या अनेक नेत्यांची नावे स्पष्टपणे नमूद केलेली आहेत आणि त्यांच्याकडून वसूल केलेली रक्कमही नमूद आहे.


वसूल केलेल्या रकमेचा संपूर्ण संदर्भ

तपास अधिकाऱ्यांनी सांगितले, 'पक्षी' हा कोडवर्ड अशा एका श्रीमंत व्यक्तीसाठी वापरला गेला होता ज्यामध्ये त्याने मोठ्या प्रमाणात पैसे भरले होते किंवा थकबाकी होती. यासह, 'माय लव्ह' कोडवर्ड टोळीतील सर्वात लहान कमी वयाच्या मुलींनी सापळ्यात अडकवलेल्या लोकांसाठी वापरत असे. या व्यतिरिक्त बर्‍याच मोठ्या नेत्यांना 'व्हीआयपी' कोडवर्डच्या प्रकारात स्थान देण्यात आले होते.


यातील काही कागदपत्रे अशी मिळाली आहेत जी एका महिलेच्या डायरीची पाने सांगत आहेत. या डायरीत मध्य प्रदेशातील अनेक माजी मंत्री आणि माजी खासदारांची नावे आहेत. डायरीची पाने सूचित करतात की
, हनी ट्रॅप टोळीने काही कोडवर्ड वापरले होते. जसे कि, 'पक्षी' आणि 'माझे प्रेम' होते. या कोडवर्डसमवेत काही निशाण व खुणा देखील आहेत. या व्यतिरिक्त त्या व्यक्तीकडून किती रक्कम व किती थकबाकी आहे याचे तपशीलवार वर्णन आहे. या पृष्ठांवरून आणखी एक गोष्ट सिद्ध झाली आहे की एखाद्या व्यक्तीला तेथे आणणे पर्यंत कोण कोणती भूमिका बजावली आणि वसूल केलेल्या रकमेमध्ये कोणी किती टक्के योगदान दिले. यासर्वचा उल्लेख यात आहे.


,००० पेक्षा जास्त क्लिपिंग

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पकडलेल्या महिलांचे मोबाइल, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्हवरून मोठ्या प्रमाणात व्हिडिओ क्लिपिंग सापडले आहेत. क्लिपिंगच्या ४०००हून अधिक फाइल्स परत मिळवल्या असून काही छायाचित्रे आणि ऑडिओ क्लिपही जप्त केल्या आहेत. गुप्तपणे या महिला त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तींच्या व्हिडिओ-क्लिप बनवत.

@@AUTHORINFO_V1@@