एका क्लीकवर मिळवा आपले मतदारयादीतील नाव

    19-Oct-2019
Total Views |


मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. आज पक्षांसाठी प्रचारासाठी शेवटचा दिवस आहे. सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा हि सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकशाहीच्या या महाउत्सवात महाराष्ट्रात एकूण ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावतील.



अशी मिळवा मतदान केंद्राची माहिती


मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या 
https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची संपूर्ण माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे. आचारसंहितेसंबंधात तक्रारी करण्यासाठी 'सी-व्हिजील ॲप'ची सुविधा उपलब्ध.







प्रशासकीय यंत्रणा सज्ज

 

विधानसभा निवडणुकीसाठी १ लाख ७९ हजार ८९५ मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि लाख २६ हजार ५०५ नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख ३५ हजार २१ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे ६ .५० लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल देखील सज्ज आहे.