बिग बी नानावटी रुग्णालयात दाखल होण्याचे कारण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2019
Total Views |


 

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांना मंगळवारी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून सर्व स्तरातून त्यांच्या स्वास्थ्यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांना नेहेमीच्या वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता बिग यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान अमिताभ बच्चन यांना यकृताच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते मात्र हा खुलासा नुकताच करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी साजरा झालेल्या करवाचौथ या सणाच्या दिवशी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तर या महिन्यात ११ तारखेला त्यांनी ७७ वा जन्मदिन सुद्धा उत्साहात साजरा केला. त्यांच्या चाहत्यांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या प्रतिभेने आणि अभिनयाच्या कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर इतके वर्ष राज्य केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे समजताच सर्व चाहते दुःखी झाले होते. मात्र आता सर्व चाहत्यांना या बातमीने नक्कीच आनंद होईल यात शंका नाही.

@@AUTHORINFO_V1@@