दहशदवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला अंतिम मुदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2019
Total Views |


पॅरीस : स्वतःच्या देशात दहशतवाद्यांना पोसून त्यांना भारताविरोधात कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला आता मोठा दणका बसला आहे. दहशतवाद्यांना वित्तपुरवठा बंद करण्यासाठी आता फेब्रुवारी २०२० पर्यंत अंतिम मुदत मिळाली आहे. असा प्रकार या मुदतीनंतर आढळल्यास पाकिस्तानला काळ्या यादीत टाकणार असल्याचा कडक इशारा फायनान्शिअल टास्क फोर्सने (एटीएफ) दिला आहे.

 

फेब्रुवारी २०२० पर्यंत तसा प्रयत्न न केल्यास एटीएफने दिलेल्या २७ अटींपैकी केवळ पाच अटींची पूर्तता पाकिस्तानने केली आहे. अन्य २२ अटींवर पाकिस्तानला आता काम करायचे आहे. पाकचा मित्र राष्ट्र चीननेही याला दुजोरा देत दहशतवाद्यांना रसद पुरवण्यात अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. मात्र, चीन, टर्की यांच्यामुळे पाकिस्तानला पाच महिन्यांची मुदत मिळाली आहे. या दरम्यान पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये राहणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@