हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2019
Total Views |



लखनऊ : उत्तर प्रदेशात लखनऊमध्ये हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यामुळे लखनऊ शहरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. खुर्शीद बाग येथील हिंदू समाज पक्षाच्या कार्यालयात चाय पिण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने मिठाईच्या डब्यातून चाकू आणि पिस्तुल आणले होते. तिवारी यांच्या गळ्यावर चाकूने वार करत ते फरार झाले.

 

हल्ल्यानंतर तिवारी यांना ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीसांचे पथक तपास करत आहे. हल्लेखोरांच्या मागावर पोलीसांचे एक पथक आहे. घटनास्थळावरून काडतूसे आणि पिस्तुल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली. तिवारी यांच्या गळ्यावर धारधार चाकू चालवल्याचे निशाण आहेत. तिवारी यांच्यावर गोळ्याही झाडल्याची प्रार्थमिक माहिती पोलीसांनी दिली आहे.

@@AUTHORINFO_V1@@