'सिनियर सिटिझन' मध्ये मोहन जोशी साकारणार मुख्य भूमिका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2019
Total Views |



मराठी चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी
'सिनियर सिटीझन' या आगामी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या चित्रपटाचे एक पोस्टर नुकतेच प्रेक्षकांसमोर आले असून या पोस्टरमध्ये मोहन जोशी एका डॅशिंग लूकमध्ये दिसत आहेत. चित्रपटाची कथा अजूनही गुलदस्त्यात असल्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी आत्तातरी काही अंदाज वर्तवणे कठीण आहे पण प्रेक्षकांनी या पोस्टरला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अजय फणसेकर दिग्दर्शित 'सिनियर सिटीझन' या चित्रपटाला ॐ क्रिएशन्सच्या माधुरी नागानंद, विजयकुमार नारंग यांचे निर्मिती साहाय्य लाभले आहे. राजू सावला क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, प्रमोद मोहिते कार्यकारी निर्माते, बी. लक्ष्मण यांनी छायांकन आणि राकेश कुडाळकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. तर अभिजित नार्वेकर यांनी संगीत आणि नृत्य दिग्दर्शक म्हणून अमित बाईंगने काम पाहिले आहे.

मोहन जोशी यांच्याबरोबरच या चित्रपटात सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार हे देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@