पाकिस्तानी घुसखोराला सुरक्षारक्षकांकडून कंठस्नान

    17-Oct-2019
Total Views |




अमृतसर : भारत पाकिस्तान सीमेवरून अटारी आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात घुसखोरी करत असताना सुरक्षा रक्षकांनी एक व्यक्तीला ठार केले. गेट नंबर १०३ मधून हा इसम पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होता. या व्यक्तीचे नाव गुलनवाज असल्याचे समोर आले. या मृतदेहाजवळ सापडलेल्या बॅगमध्ये कपडे, पाकिस्तानी करंसीचे १६० रुपये (यामध्ये ५०-५० च्या तीन नोटा आणि पाचची दोन नाणी), एक पर्स, एक सिम कार्ड, एक मेमरी कार्ड सापडले.

 

जॉईंट चेकपोस्ट अटारीवर बीएसएफ जवान संध्याकाळी ड्यूटी करत होते. त्यावेळी पाकिस्तानच्या दिशेने एका व्यक्तीस घुसखोरी करताना सुरक्षारक्षकांनी पहिले. बीएसएफने त्याला माघारी जाण्याची सूचना केली. पण त्या घुसखोराने याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर बीएसएफने त्याच्यावर फायरिंग केली. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. यानंतर तात्काळ बीएसएफचे डीआयजी जेएस ओबराय यांच्यासहित अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यानंतर तात्काळ बीएसएफ जवानांनी रेंजर्स सोबत पाकिस्तानशी फ्लॅग मिटींग करत ही माहिती देत याची ओळख पटवण्यास सांगितले पण पाकिस्तानने तसे करण्यास नकार दिला.

अग्रलेख
जरुर वाचा
अभिजीतला

अभिजीतला 'अमोल' साथ; 'सुंदर मी होणार’ नाटकात अभिजीत चव्हाण आणि अमोल बावडेकर दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत!

चौकट मोडून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून पाहायला कलाकार कायमच उत्सुक असतात. आपल्या विनोदी शैलीने मालिका आणि चित्रपटात मजेशीर रंग भरणारे अभिनेते अभिजीत चव्हाण आता प्रथमच वेगळ्या सशक्त भूमिकेत दिसणार आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातल्या महाराज (संस्थानिक) या महत्त्वपूर्ण भूमिकेतून अभिजीत चव्हाण अनेक वर्षानंतर मराठी रंगभूमीवर काम करणार आहेत. स्वतःची विनोदी इमेज ब्रेक करत एक अत्यंत गंभीर आणि भावनिक पात्र साकारण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या अभिजीत यांना साथ करत अभिनेते अमोल बावडेकर यांचा ही अनोखा अंदाज या नाटकात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121