ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणार इथेनॉलची जोड : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2019
Total Views |



सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सातारकारांशी थेट संवाद साधला. तुळजा भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून पंतप्रधान मोदींनी मराठी भाषेतून आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादीवर सडकून टीका केलीच, तसेच ऊस उत्पादकांच्या समस्येवरदेखील त्यांनी भाष्य केले. "ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता इथेनॉलच्या उत्पादनावर भर देण्यात येणार आहे. यासाठी देशभरात आधुनिक कारखाने बांधली जात आहेत. आमचा प्रयत्न आहे की येत्या काळात सुमारे १०% इथेनॉल हा पेट्रोल आणि डिझेलमध्ये वापरण्यात येईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मागील ५ वर्षात सर्वतोपरी प्रयत्न केले गेले आहेत."

 

सिंचन प्रकल्पामध्ये प्रयत्नशील

 

आपले सरकार सिंचन प्रकल्पासाठी प्रयत्नशील राहिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीद्वारे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी कुटुंबांना चांगला फायदा होत आहे. लहान शेतकरी कुटुंबे, शेतमजूर, लहान दुकानदार यांना वयाच्या ६०व्या वर्षांनंतरही निवृत्तीवेतनाची सुविधा निश्चित केली गेली. जेव्हा तुम्ही नरेंद्र मोदींना आणि महाराष्ट्रात देवेंद्र यांना संधी दिली तेव्हा जुन्या फाईल्स उघडल्या गेल्या, आता सिंचन प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे.

 

साताऱ्यातून देशाला मिळाले सर्वाधिक संरक्षण बळ

 

गेल्या पाच वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारने शिवाजी महाराजांच्या संस्कारांना अनुसरून काम केले आहे. या सरकारने देशाचे संरक्षण आणि राष्ट्रवादाला प्राधान्य दिले. त्यासाठी सरकारने भारतीय लष्कराची क्षमता वाढवून त्यांना इतर देशांच्या बरोबरीला आणून ठेवले आहे. भूदल, नौदल किंवा वायूदल असो, प्रत्येक ठिकाणी आधुनिक शस्त्रे ही लष्कराच्या ताफ्यात सामील झाली आहेत. साताऱ्यातील तरुण पिढीचे देशाच्या संरक्षणामध्ये महत्वाचा वाटा आहे.

@@AUTHORINFO_V1@@