एनसीपीएमध्ये डिझाईन्स ऑफ स्पेस अँड टाइम नृत्य प्रकाराचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2019
Total Views |


मुंबई: पन्नासाव्या वर्षात पदार्पण करणार्‍या नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस म्हणजेच एनसीपीए ने दि. २० ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता अदिती मंगलदास द्वारा प्रस्तुत कदंम्ब अँड फुटप्रिंट्स ऑन वॉटर(अर्क) डिझाईन्स ऑफ स्पेस अँड टाइंम या अनोख्या नृत्य प्रकाराचे आयोजन केले आहे. एनसीपीए च्या टाटा थिएटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाची माहिती देताना एनसीपीए च्या डान्स प्रोग्रामिंग विभागाच्या प्रमुख स्वप्नोकल्पा दासगुप्ता यांनी सांगितले की, “एनसीपीए चा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही वर्षभर अनेक खास कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कथ्थक नृत्य प्रकारात कुमुदिनी लाखीया यांचे नाव एक अतिशय वरिष्ठ आणि कोरिओग्राफीमध्ये नवनवीन आयाम जोडणार्‍या कलाकारांच्यात समाविष्ट करण्यात येते. त्याचप्रमाणे अदिती मंगलदास यांनाही भारतीय आणि पाश्‍चात्य नृत्यप्रकारांमधील अंतराच्या भिंती तोडणारी कलाकार म्हणून ओळखले जाते. मंगलदास यांनी सादर केलेले नाविण्यपूर्ण नृत्य प्रकार भारतीय तसेच पाश्‍चात्य प्रेक्षकांनाही आकर्षित करतात. अदिती मंगलदास या कुमुदिनी लाखीया यांच्या विद्यार्थिनी असून एनसीपीए च्या व्यासपीठावर या दोघी प्रथमच एकत्र येउन आपल्या अनोख्या कोरिओग्राफी सादर करणार आहेत. या माध्यमातून भारतीय संगीत आणि नृत्य परंपरेचा गाभा असणार्‍या गुरु आणि शिष्य परंपरेचे पालन या ठिकाणी अनुभवता येईल.

कदंब नृत्य प्रकार हा भारतामध्ये कथ्थकमधील सर्वात आकर्षक आणि अनोखा भाग मानला जातो. कथ्थक नृत्य प्रकारातील दिग्गज समजल्या जाणार्‍या पद्मभूषण कुमुदिनी लाखीया यांनी शास्त्रीय कथ्थकचा प्रसार करण्यासाठी आपले अवघे आयुष्य वेचले आहे. एनसीपीए मध्ये आयोजित कार्यक्रमात कथ्थकमधील धुरीण सद्गुण, सुस्पष्टता आणि अभिजात कलेच्या माध्यमातून कथ्थकमधील आपले कौशल्य सादर करतील. शायंबिना या सादरीकरणात कथ्थक अभिनयातील दिलखेचक नजाकत सादर केली जाणार आहे. त्यानंतर सादर केल्या जाणार्‍या अंगशुध्दी या सादरीकरणात अतिशय गुंतागुंतीचे पदलालित्य पाहता येईल. यामध्ये उल्हासाची प्रतिके म्हणून दोलायमाने तुकडे आणि सुक्ष्म अभिनयाचे प्रदर्शन करण्यात येईल. सायंकाळच्या या मैफलीमध्ये चार चांद जोडण्यासाठी पुरुष नर्तकांच्याकडून सादर केले जाणारे अतिशय वेगवान असे पदांत हे नृत्य सादर केले जाणार आहे. पदांतमध्ये सहभागी कलाकार तरंगते पदलालित्य दाखवत तालमय पॅटर्न सादर करुन वातावरणात अनोखी जान आणतील. याच्या सोबतीला वाजवण्यात येणार्‍या पखवाज, तबला आणि पेर्मेलूबॉल्ससारख्या वाद्यांच्या तालामुळे एका अनोख्या उत्साहपूर्ण उर्जेची अनुभूती मिळेल.

@@AUTHORINFO_V1@@