सलामी जोडीला 'सलाम' : शहिदांच्या कुटूंबियांना करतात 'अशी' मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2019
Total Views |
 


नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग फलंदाज म्हणून धडाकेबाज मात्र, मैदानाबाहेर अत्यंत हळवा, असा माणूस. त्याच्या याच दायित्वाचे दर्शन नुकतेच घडले. त्यांच्या अनोख्या कामामुळे देशभरातील नेटीझन्सनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या मुलांना मोफत क्रिकेटचे प्रशिक्षण देण्याचे आश्वासन त्याने दिले होते. विरूने शब्द पाळत त्यांच्या प्रशिक्षणालाही सुरुवात केली. याबद्दलची माहिती त्यांने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली.



 

 

गौतम गंभीरनेही केली वचनपूर्ती

माजी क्रिकेटपटू व भाजप खासदार गौतम गंभीर यालाही सैन्यदलात भरती न होता आल्याचे दुःख होते. मात्र, त्याने पुलवामा हल्ल्यावेळी ही खंत व्यक्त केली होती. मात्र, एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शहिद जवानांच्या ५० मुलांचा खर्च त्याने उचलला. आता यापुढे एकूण शंभर मुलांच्या शिक्षण आणि इतर खर्चाची जबाबदारी उचलणार असल्याचे गंभीरने सांगितले आहे.



 

@@AUTHORINFO_V1@@