धक्कादायक ! मुंबईत ७३ कोटींची पाणीचोरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2019
Total Views |



मुंबई
: देशाची आर्थिक राजधानीचे शहर असणाऱ्या मुंबईत पाणीचोरीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले. तब्बल ७३ कोटींच्या पाणीचोरीचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील आझाद चौक मदन पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला असून ६ जणांच्या विरोधात एफआयआर दाखल झाली आहे. काळबादेवी याभागातील बोमनजी मास्टर लेनमधील पांड्या मेन्शनच्या मालकावर या चोरीचा आरोप आहे. मागील ११ वर्षात या व्यक्तीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या लोकांच्या मदतीने विहिरी खोदून त्याद्वारे हि पाणीचोरी केली.एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिलेल्या पुराव्यांच्या आधारे हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हा प्रकार लक्षात येताच पाण्याची चोरी झाल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली असून यामध्ये ७३.१८ कोटी रुपयांची चोरी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूगर्भातील पाण्याची चोरी तीसुद्धा तेही तब्बल ७३ कोटींची असल्याचे समजल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनाही धक्का बसला. पोलिस याप्रकरणी चौकशी करत असून आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांड्या यांच्या नावावर २ अनधिकृत विहिरी खोदल्याच आरोप आहे. त्या विहिरीतील पाणी पंपाच्या साहाय्याने उपसा करून टँकर ऑपरेटर्सला विकले गेले. २००६ ते २०१७ दरम्यान त्यांनी तब्बल ७३.१८ महाराष्ट्रात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असताना भूगर्भातील पाण्याची इतकी मोठी चोरी होण्याचा प्रकार धक्कादायक आहे.
@@AUTHORINFO_V1@@