अयोध्या सुनावणी : मुस्लिम पक्षाच्या वकिलाने कागदपत्रे फाडली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2019
Total Views |


जेष्ठ विधिज्ञ राजीव धवन यांनी केला उद्दामपणा


नवी दिल्ली (वृत्तसंस्था): अयोध्या प्रकरणावर सुनावणी अंतिम टप्प्यात असून आज चाळिसाव्या दिवशी कामकाज सुरू आहे. सुनावणी दरम्यान मुस्लिम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी मात्र कागदपत्रे फाडून टाकली. जेष्ठ विधिज्ञाने अशाप्रकारे न्यायालयीन सुनावणीचा अपमान करण्याची हि पहिलीच वेळ असावी. अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने सादर करण्यात आलेले नकाशे , कागदपत्रे राजीव धवन यांनी फाडून टाकले आहेत. सरन्यायाधीशांनी त्यांना थांबण्याचे निर्देश दिले पण तरीही राजीव धवन यांनी असा उद्दामपणा सुरूच ठेवला. अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या प्रती, प्रतिपक्षाचे वकील म्हणून राजीव धवन यांना देण्यात आल्या होत्या.


आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांना युक्तिवाद संपविण्याच्या सूचना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिल्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@