'कार्गो' या सायन्स फिक्शनची ही झलक पहा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2019
Total Views |


अनुराग कश्यप निर्मित 'कार्गो' हा भारतातील पहिला स्पेसशिपवरील साय फाय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आगामी काळात १८ आणि १९ ऑक्टोबरला होणाऱ्या मामी चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात येणार आहे. विक्रांत मेस्सी आणि श्वेता त्रिपाठी या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. 'पुष्पक ६३४ A' या प्रोजेक्टवर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटाची एक झलक प्रेक्षकांसमोर आली आहे.

चित्रपटाच्या आज प्रदर्शित झालेल्या टीजरमुळे प्रेक्षकांना हॉलिवूडमधील मास्टरपीस असलेल्या इंटरस्टेलर, ग्रॅव्हिटी अशा चित्रपटांची आठवण तर होईलच पण त्याचबरोबर भारतातील पौराणिक शास्त्र आणि लोकसंस्कृती याचा विज्ञानाचे असे अविष्कार घडवण्यासाठी कशी मदत झाली हे देखील तुम्हाला लक्षात येईल. शिवाय या चित्रपटामध्ये भारतीयांच्या भावना आणि संस्कृती यांची गुंतागुंत कशी असते हे देखील पाहता येणार आहे.

'पुष्पक ६३४ A' या वैज्ञानिक उपक्रमामध्ये माणसाच्या मरणोत्तर जीवनाचा अभ्यास याचा समावेश आहे. त्यामुळे या उपक्रमाची एक छोटी झलक सुद्धा आज प्रदर्शित झालेल्या या टीजरमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि हा टीजर पाहिल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता नक्कीच वाढेल.

@@AUTHORINFO_V1@@